Search This Blog

Tuesday, February 23, 2010

प्रेमात पडतांना

0 comments
' प्रेमात पडतांना '

तिच्या प्रेमात पडतांना
तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं
तोंड दुखेपर्यंत बडबडलो
पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं.
तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं
तिच्या नजरेला नजर भिडवतांना
तिला डोळ्यात साठवायचं राहूनच गेलं.
तिच्या हाताचा, ओठणीचा,
स्पर्श हवाहवासा वाटतो
सांगेन तिला कधीतरी म्हणतांना
हा विषय काढायचं राहूनच गेलं.
हसत राहीलो, हसवत राहिलो
तिला दरवेळी, दर भेटीला.
तिच्या हसण्यामागचे अर्थ शोधतांना
माझ्या हसविण्याचा मतितार्थ सांगायचं राहूनचं गेलं.
ती आली की वेळही
उडून जायचा मला न समजता.
पण,
त्या दिवशी ती आली आणि निघाली
त्यावेळी तिला नेमकं अडवायचं राहून गेलं...

vachanat aaleli kavita....

Monday, February 15, 2010

सचिन

0 comments
मैं खेलेगा!सचिनने १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरूवात केली. १६ वर्षीय सचिनच्या समोर इम्रान खान, वसीम अक्रम आणि अब्दुल कादीर सारखे खतरनाक गोलंदाज होते. याच दौ-यात सचिनला एका सामन्यात बॉल लागल्यानंतर रक्त वाहू लागलं. तर दुस-या बाजूला उभ्या असलेल्या नवज्योतसिंग सिध्दूने विचारलं पॅवेलियन जाणार का तर त्यावेळेस सचिन म्हणाला ैं खेलेगा

रचला धावांचा डोंगरकसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी सुरू होती. पण वन डेमध्ये अजूनही शतक करता आले नव्हते. प्रशंसकांना आणि क्रिकेट प्रेमींना माहित होते की अनुभवच माणसाला परिपक्व बनतो. त्यानुसार ७९ सामन्यानंतर सचिनने वनडेत पहिलं शतक झळकावलं. त्यानंतर वन डे सामन्यात सर्वाधिक शतके झळकवण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे.
गोलंदाजांचा कर्दनकाळ९०च्या दशकात सचिनचे करिअरला बहार आला होता. सचिन समोर असणार हा विचार सुद्धा गोलंदाजांना विचलीत करायचा. सचिनने चांगले झोडपल्यानंतर महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने कबूल केले की सचिन तेंडुलकर स्वप्नातही येऊन आपल्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतात.
' डॉन ' चा वारसदार सर डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या ड्रिम टीममध्ये सचिन तेंडुलकर याला स्थान दिलं. ब्रॅडमन यांच्या टीममध्ये स्थान प्राप्त करणारा सचिन हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. सचिनच्या खेळात मी स्वतःला पाहतो, असं ब्रॅडमन यांनी कबूल केलं होतं.
जीवाचा जीवलगसचिनच्या हृदयाची चोरी केली ती गुजराती उद्योगपतीची डॉक्टर मुलगी अंजली मेहता हीने. १९९५ मध्ये त्यांचं शुभमंगल झालं. त्या सुखी दाम्पत्याला आता मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन अशी दोन मुलं आहेत.
आशीर्वाद बाबांचे... सचिनला १९९९च्या वर्ल्ड कप सुरू असताना फार मोठी वैयक्तीक हानी झाली. या दरम्यान त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांचं निधन झालं. या सा-या दुःखातून तो सावरून परतला तर त्याने केनियाच्या विरुद्ध शतक झळकावले.
सोळा हजारात देखणा... ऑस्ट्रेलिया सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वन डे सामन्यातील १६ हजार धावांचा टप्पा गाठला. त्यावेळी वीरेंद्र सेहवाग त्याचे अभिनंदन करताना.


का? का? का?

0 comments
का? का? का?

. पोहणे हा जगातला सर्वात बेस्ट व्यायाम असेल, तर देवमासे इतके जाडे ढोले का असतात?
. स्टेडियममध्ये जिथे प्रेक्षक 'बसतात' त्या जागेला 'स्टँड' का म्हणतात?
. जगात सर्वांना स्वर्गात जायचं असतं, पण मरायचं कुणालाच नसतं, असं का?
. बुद्धिबळाच्या पटावरही वर्णभेद असतो का? नसेल, तर मग पांढऱ्या सोंगट्यांना पहिली चाल का?

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

0 comments
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

गरज म्हणून 'नातं' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते... फक्त जरा समजून घे
'नातं' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं.. दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस
मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय

काही प्रश्न

0 comments
काही प्रश्न :

१. मानुस जर माकडापासुन उत्क्रांत झाला असेल तर आजही माकडे कशी आहेत?

२. अनुभवी डौक्टर ही कुठेतरी "प्रॅक्टीस" कसे करतात?

३. शेंगदाणा तेल - शेंगदाण्यापासुन, सुर्यफुल तेल - सुर्यफुलापासुन तर मग "बेबी - ओईल" कशापासुन बनवतात?

४. बरीच "कामे जुळवणा-याला" - ब्रोकर का म्हणतात?

५. "फ्रेंच किस"ला फ्रान्स मध्ये काय म्हणतात?

६. बांधकाम पुर्ण झालेल्या ईमारतीलाही "बिल्डींग" का म्हणतात?

७. प्रकाशाचा वेग माहिती आहे.... अंधाराचा किती असतो?

८. गोल पिझ्झा नेहमीच चौकोनी पॅकमध्ये का पाठवतात?

९. जंगल मॅन टारझन ला दाढी कशी काय नव्हती?....

१०. "फ्री गिफ्ट" म्हणजे काय? गिफ्ट फ्रीच असतात ना?

११. ५ मधील ४ लोक डायरियाने त्रस्त आहेत .... म्हणजे ५ वा डायरियाचा आनंद घेतोय काय?........

१२. जर आपला जन्म ईतरांची मदत करण्यासाठी झाला असेल तर ईतर लोक कशासाठी जन्मलेत?

१३. "पार्टी" संपल्यानंतर येखादीतरी मुलगी रडताना का दिसते?............

१४. कंप्युटर बंद करण्यासाठी "स्टार्ट" वर का क्लिक करावे लागते?

१५. २१ - ट्वेंटी वन , ३१ - थर्टी - वन मग, ११ - वन्टी वन का नाही?..........

मैत्रीण

0 comments

हाच तर जिवलग मित्र असतो

0 comments
हाच तर जिवलग मित्र असतो

१ दिवस फोन नहीं केला तर रागवतो
फोन केला तरीही शिव्या घालतो

समोरून एखादी फाकडू पोरगी जात असेल तर
तिच्या समोर मस्त पोपट करतो

कॉलेज ला आल्यावर पहिला कॉल आपल्याला करतो
कुठे आहेस म्हणुन विचारतो

पिकनिक ला जाताना
आई बाबांना हाच तर मस्का लावायला कामी येतो

बाइक वरून पडलो की सगळे हसत असताना
धावत येउन उचलतो

आपण विसरलो तरीही
वाढदिवशी १२ वाजता बरोबर मेसेज करतो

परिक्षेच्या वेळी
सुपरवायज़रला घाल चुलीत म्हणुन सप्प्लिमेंट हातात देतो

काही चुकले तर ओरडतो
गरज असेल तर कान पीळतो

इतर मित्रांच्या तुलनेत
आपली जास्त काळजी घेत असतो

हाच असतो जो
आपल्या कली रूपी आयुष्याला फुलवत नेत असतो

हाच असतो जो
आपल्या कृष्ण-धवल आयुष्यात रंगांची उधलन करत असतो

दुखात असताना.. जवळ येउन काय झाल..? म्हणुन विचारतो
आपण नजर खाली करून काही नाही म्हणुन त्याला टाळतो

आपल्या डोळ्यात बघून
काय रे एवढा परका झालो का..? असा उलट प्रश्न करतो

सुखात हक्काने पार्टी मागणारा
आणि दुखात रडायला खांदा देणारा हाच तर जिवलग मित्र असतो

Author - Unknown

प्रेम करणं सोपं नसतं

0 comments
प्रेम करणं सोपं नसतं...
सर्व करतात, म्हणून करायच नसतं..
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं...
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं...
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...
शाळा कॉलेजांत असच घडतं...
एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं...
अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचच रुप दिसतं...
जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं...
ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं...
करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं...
सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...
हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं...
पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं...
फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं...
मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं...
डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं...
आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं...
एवढ सगळं करणं खुप कठीण असतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...

Author - Unknown

दुकानात डायरी पाहिली की

0 comments
दुकानात डायरी पाहिली की
तिला विकत घ्यावंसं वाटतं
रोजच्या आठवणींचे गुंते
कागदावर सोडवावंसं वाटतं

तोच दिवस, तशीच रात्र
जिवनात काय आहे तरी नवं
सगळंच पोकळ वाटतं
मला काही वाटत नाही हवं

क्षण, शिक्षण बनायला
ते डोक्यात उरावे लागतात
प्रसंग, आठवणी बनायला
ते कुठेतरी मुरावे लागतात

दर क्षणाला कैद करणारा
माझा हा अट्टाहास कसला
क्षणाला, क्षणासारखं जगतो मी
माझं जीवन, रुका हुआ फैसला

चांगले प्रसंग कधीच आठवत नाहीत
मी फक्त वाईट प्रसंगांना आठवतो
म्हणून भुतकाळात जगणाऱ्यांसाठी
मी डायरी दुकानातच ठेवतो...

Author - Unknown

Saturday, February 13, 2010

दुसरं आपल्या हातात काय असतं!

0 comments
बायको जेंव्हा बोलत असते...
बायको जेंव्हा बोलत असते
तेंव्हा ऐकून घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

भडका असतो उडालेला
अनावर असतो रोष
वाभाडे काढत आपले ती
सांगत असते दोष
आपले दोष, आपल्या चुका
सारं सारं...
स्वीकारायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

शब्दानं शब्द वाढत जातो
भडकत जातो तंटा
म्हणून वेळीच ओळखायची असते
आपण धोक्याची घंटा
समोरची तोफ बरसली तरी
आपण...
तोंड उघडायचं नसतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

गरजून बरसून झाल्यानंतर
थकून जाते बायको
आग पाखडून झाल्यानंतर
शांतही होते बायको
अशाच वेळी विसरून सारं
तिला...
जवळ घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

तिची चिडचिड, तिचा संताप
प्रेमच असतं हेही
तिची बडबड, तिची कडकड
प्रेमच असतं तेही
तिचं प्रेम तिनं करावं
आपलं....
आपण करायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं

Author - Unknown

कधी असेही जगून बघा…..

0 comments
माणूस म्हणून जगताना
हा एक हिशोब करुन तर बघा!
“किती जगलो” याऐवजी “कसे जगलो”?
हा एक प्रश्न जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

संकटांमुळे खचून जाणारे तर शेकडोंनी मिळतात
कधीतरी अडचणींवर मात करण्याची हिम्मत दाखवुन तर बघा!
स्वतःपुरता विचार तर नेहमीच करतो आपण
कधीतरी बुडत्या्साठी काठीचा आधार होउन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

वर्तमान आणि भवि्ष्याची चिंता तर सदाचीच असते
कधीतरी भूतकाळाच्या वि्श्वात गुंगून तर बघा!
काळाची वाळू हातातुन निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण पुन्हा एकदा जगून तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

प्रतिसादाची काळजी का करावी नेहमी?
एखाद्यावर जिवापाड,निर्मळ,एकतर्फी प्रेम करुन तर बघा!
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग कुतूहल करते
त्या अथांग भावनेची व्याख्या करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

अतिसामान्य जीवन नशीबी असले म्हणून काय झाले?
कधीतरी सामान्यातले असामान्य होण्याची जिद्द दाखवून तर बघा!
चिमणीसारखा जन्म मिळाला असला तर काय झाले?
आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

आयुष्य रोजच वेगवेगळे रंग उधळते
त्या रंगांमधे आनंदाने रंगून तर बघा!
तसे जगायला काय?कुत्रे-मांजरीही जगतात हो
कधीतरी माणूस म्हणुन स्वतःच्या जगण्याचा उद्देश शोधून तर बघा!
कधी असेही जगून बघा…..

Author - Unknown

Thursday, February 11, 2010

Valentine Day

1 comments










Nice Photography

0 comments





Rose For U

0 comments

आप कब समझ पाएंगे मुझे

0 comments
आप कब समझ पाएंगे मुझे,

दूरियों से फर्क पड़ता नहीं
बात तो दिलों कि नज़दीकियों से होती है
दोस्ती तो कुछ आप जैसो से है
वरना मुलाकात तो जाने कितनों से होती है
दिल से खेलना हमे आता नहीं
इसलिये इश्क की बाजी हम हार गए
शायद मेरी जिन्दगी से बहुत प्यार था उन्हें
इसलिये मुझे जिंदा ही मार गए
लोग मोहब्बत को खुदा का नाम देते है,
कोई करता है तो इल्जाम देते है।
कहते है पत्थर दिल रोया नही करते,
और पत्थर के रोने को झरने का नाम देते है।
भीगी आँखों से मुस्कराने में मज़ा और है,
हसते हँसते पलके भीगने में मज़ा और है,
बात कहके तो कोई भी समझलेता है,
पर खामोशी कोई समझे तो मज़ा और है...!
मुस्कराना ही ख़ुशी नहीं होती,
उम्र बिताना ही ज़िन्दगी नहीं होती,
दोस्त को रोज याद करना पड़ता है,
क्योकि दोस्त कहना ही दोस्ती नहीं होती

Author - Unknown

ते पण एक वय असतं

0 comments
ते पण एक वय असतं
दिवसभर पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक करून घेण्याचं

ते पण एक वय असतं
हाफ चड्डीत गावभर फिरायचं
आईची नजर चुकवून डब्यातलं खायचं
ते पण एक वय असतं
मुलींच्या स्क्रॅपबुक्स भरायचं
आणि तरीही त्यांच्याशी बोलायला लाजायचं
ते पण एक वय असतं
घरी खोटं बोलून पिक्चरला जायचं
आवाज म्युट करून रात्री एफटीव्ही पहायचं

ते पण एक वय असतं
तिच्यावरचं खरं प्रेम तिला सांगून टाकायचं
तिच्या उत्तराची वाट पाहत रात्रंदिवस झुरायचं

ते पण एक वय असतं
आता छोकरी नंतर नोकरीच्या मागे लागायचं
पॅकेजचा विचार करत B.E.ची स्वप्नं पहायचं

ते पण एक वय असतं
लग्नाच्या 'डोमिनियन स्टेटस' आधी तारूण्यातला टोटल इंडिपेंडंस आठवायचं
आई आणि बायकोत कितीही भांडणं झाली तरी आपण मात्र शांत रहायचं

ते पण एक वय असतं
प्रिमियम्सच्या चिंतेत रात्रभर जागायचं
शेअर मार्केटच्या तालावर आपल्या इन्व्हेस्टमेंट्सना नाचवायचं

ते पण एक वय असतं
आपल्या मुलांचे सगळे हट्ट पुरवायचं
त्यांच्या साठी स्थळ शोधताना आपलं तारूण्य आठवायचं

ते पण एक वय असतं
सगळ्या जबाबदार्‍या पार पाडल्यावर गॅलरीत पाय पसरून बसण्याचं
आभाळाकडे पाहत फक्त यमाच्या निर्देशाची वाट पाहत बसण्याचं

Author - Unknown
 
footer Earn upto Rs. 9,000 pm checking Emails. Join now!